दौंड तालुक्यात अनेक तरूणांनी केला शिवसेनेत प्रवेश

सचिन आव्हाड

दौंड तालुक्यात शिवबंधन बांधुन अनेक तरुण शिवसेनेत प्रवेश करीत आहेत . तालुक्यातील चौफुला येथील शिवसेना कार्यालयात तरुणांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश पासलकर आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला .

दौंड विधानसभा मतदार संघातील ताराचंद राठोड ,संदीप थोरात, राहुल पवार, सुनिल पवार, ओंकार पवार ,पंडित राठोड ,अजय चव्हाण , मल्हेश राठोड ,सागर धुमाळ , सुभाष चव्हाण या तरूणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला

या वेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष महेश पासलकर , युवासेना जिल्हा समन्वयक निलेश शिवाजीराव मेमाणे,युवा सेना उपजिल्हा युवा अधिकारी योगेश फडके युवा सेना तालुका युवा अधिकारी समिर भोईटे,शिवसेना उपविभाग प्रमुख राहूल फडके इ.शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleसांगरूण मध्ये घरगुती पाच दिवसाच्या गौरी गणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप
Next articleमहाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघातर्फे सुप्रिया सुळे यांना निवेदन