सांगरूण मध्ये घरगुती पाच दिवसाच्या गौरी गणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप

अतुल पवळे, पुणे

गणेश चतुर्थी पासून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमना पासून सुरू असणारी धावपळ व आनंदाचे वातावरण गोडधोड पदार्थ मोदक हे एक चैतन्य निर्माण करणारे वातावरण त्याचसोबत विविध प्रकारची आरास, विधुत रोषणाई अशी अनेक प्रकारची सेवा प्रत्येक भक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी करत असतो. सतत पाच दिवस सेवा करता करता कळतच नाही निरोप द्यायची वेळ कधी आली.

लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे प्रत्येक घरातला आनंद शिगेला पोहोचलेला असतो. आज त्याच घरगुती गौरी गणपतीला सांगरूण गावच्या नदी काठी भक्तीमय वातावरणात निरोप गणेशभक्तांनी दिला.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणांनी अवघा नदीकाठ दुमदुमून सोडला होता. परंतु आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येक गणेशभक्ताचा कंठ दाटून आलेला पाहायला मिळाला. निरोप देताना देवाकडे मागणी देखील केली ती म्हणजे कोरोनासारखी जागतिक महामारी संपूष्टात येऊ दे.

Previous articleबारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी अजिंक्य टेकवडे यांची निवड
Next articleदौंड तालुक्यात अनेक तरूणांनी केला शिवसेनेत प्रवेश