बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी अजिंक्य टेकवडे यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

अजिंक्य अशोक टेकवडे यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी निवड केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी माजी आमदार अशोकराव टेकवडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी आधिकारी म्हाडाचे संभाजीराव झेंडे, कांचन निगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी सर्वांना विश्वासात घेऊन पार पाडणार तसेच पक्षाचे विचार जास्तीत जास्त तरुणांन पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करुन तरुणांना पक्षाच्या संघटनेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत अजिंक्य टेकवडे यांनी सांगितले.

Previous articleशिक्षणाचे सर्व प्रवाह फक्त भारतातच – रामचंद्र देखणे
Next articleसांगरूण मध्ये घरगुती पाच दिवसाच्या गौरी गणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप