शिक्षणाचे सर्व प्रवाह फक्त भारतातच – रामचंद्र देखणे

अमोल भोसले,पुणे

शिक्षक हा ज्ञानाचा प्रबोधक व उपासक आहे. शिक्षणातून मूल्यजागृती घडायला हवे. भारताला पाच हजार वर्षांची शैक्षणिक परंपरा आहे. वेदकालीन शिक्षणापासून आधुनिक शिक्षणापर्यंत शिक्षणाचे सर्व प्रवाह फक्त भारताच वाहत आहेत आणि ते वाहत ठेवण्याचे काम फक्त शिक्षक करीत आहेत. म्हणून ज्ञानाची निष्ठा व शिक्षकांची प्रतिष्ठा वाढायला हवी असे मत जेष्ठ साहित्यीक रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने संत तुकाराम विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व लोहगाव भागातील शिक्षकांचा व यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम लोहगाव येथे पार पडला.

यावेळी जेष्ठ नेते पाडुरंग खेसे, प्राचार्य व्ही आर कातोरे, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र खांदवे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक खांदवे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे, अर्जुन गरुड, सुनिल खांदवे, सतिश लांडगे, शामराव दौंडकर, छबन खांदवे, नवनाथ मोझे, प्रतिम खांदवे, हेमंत खेसे, माऊली खांदवे, बाळासाहेब खांदवे, डॉ राजेश साठे, सुभाष काळभोर, सचिन निंबाळकर, अजय खांदवे, शांताराम खांदवे, सोमनाथ मोझे, रमेश निंबाळकर, पै. संतोष गरुड, सनी खेसे, राजू खांदवे, संदेश येवले, नवनाथ अवघडे, शिक्षक, माजी विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खांदवे व भानुदास खांदवे यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा सागर खांदवे व जालिंदर मोझे यांनी सांगितली. सागर खांदवे व जालिंदर मोझे यांनी आभार मानले.

Previous articleविकासाला विरोध नाही मात्र प्रकल्पबाधितांचा विचार व्हावा’ खासदार डॉ. अमोल कोल्हे
Next articleबारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी अजिंक्य टेकवडे यांची निवड