इयत्ता 10 वी चा निकाल उद्या दुपारी एक वाजता होणार जाहीर

Ad 1

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल उध्या, बुधवार दि.29 जुलै 2020 रोजी दुपारी ०१:०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये 10 वी च्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या,याचा निकाल उध्या दुपारी ०१:०० वाजता जाहीर होणार आहे, विद्यार्थ्यांनी आपला निकाल खालील लिंकवरती पाहावा
mahresult.nic.in खालील link वर आपण Result पाहू शकता..

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com