रामनगर मधील म्हसोबा चौकातील तुंबलेला चेंबर स्वच्छ केल्याने ड्रेनेज लाईन सुरळीत

 

अतुल पवळे, पुणे

‘मैलापाणी मुक्त परिसर’ हा पराग ढेणे यांचा उपक्रम कायम चालू असतो. या उपक्रमाच्या अंतर्गत शेकडो ड्रेनेज आत्तापर्यंत स्वच्छ केल्या आणि पुढेही हे काम कायमस्वरूपी चालूच राहील. अशी प्रतिक्रिया पराग ढेणे यांनी नागरिकांना दिली.

रामनगर मधील म्हसोबा चौकात एक ड्रेनेज लाईन बऱ्याच दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत होती. तेथे पाहणी केली असता. बरीच माती व गाळ त्या लाईन मध्ये साठलेली निदर्शनास आली. ती पूर्ण लाईन यावेळी पराग ढेणे यांच्या मार्फत स्वच्छ करून घेण्यात आली.

साधारण एक टेम्पो भरेल एवढी माती व गाळ यामधून काढण्यात आला. व ड्रेनेज लाईन सुरळीत करून देण्यात आली. हे काम पुढेही असेच चालु राहील. नागरिकांच्या प्रत्येक समस्येवर काम केले जाईल,असे पराग ढेणे यांनी सांगितले.

Previous articleमहिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन 
Next articleगणेशोत्सव विशेष : श्री गणपती कडून जाणून घेऊ या ; सर्वोत्तम नेता होण्यासाठी लागणारे गुण- आशुतोष महाराज