महिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन 

अतुल पवळे, पुणे

पुणे शहरात गेल्या काही दिवसात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या निंदनीय घटनांमुळे दोन निष्पाप जीवांना भावी कोणत्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागेल हे आपण जाणतोच. परंतु आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहू. या प्रकरणातील आरोपींना पुणे शहर पोलिसांनी काही तासातच अटक केली असल्याने पुणेकरांच्या वतीने या कारवाईबद्दल आम्ही पोलिसांचे आभार मानतो. कोणताही गुन्हेगार कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही, हे यावरून सिद्ध होते. या संपूर्ण तपासात पोलिसांनी गुन्हेगारांना कठोर शासन होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून पुन्हा कुणाचीही असे गैरवर्तन करण्याची हिंमत होणार नाही.

या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर तसेच पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सुपूर्द केले.

यावेळी समवेत नगरसेविका सौ.नंदाताई लोणकर, महिला शहराध्यक्षा सौ मृणालीनीताई वाणी आदी उपस्थित होते.

Previous articleअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट
Next articleरामनगर मधील म्हसोबा चौकातील तुंबलेला चेंबर स्वच्छ केल्याने ड्रेनेज लाईन सुरळीत