किल्ले तोरणा गडावर स्वराज्य संघाच्या वतीने स्वच्छता 

 पुणे- स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले तोरणा स्वच्छता मोहीम (दि.12 ) रोजी पार पडली.

या मोहिमेमध्ये स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे सहसचिव राजेश कान्हूरकर राज्य विस्तारक सचिन कारले ,राज्य संपर्कप्रमुख सचिन उढाणे ,पुणे जिल्हा सल्लागार संतोष गावडे, दत्ताशेठ हिंगे पाटील,पवन भोसले, उदय शिंदे तसेच धाराशिव जिल्ह्यातील संघाचे कार्यकर्ते धीरज शिंदे गौतम इंगळे गणेश सावळकर अशोक चौरे दीपक स्वामी हे मोहिमेला उपस्थित होते.

   यावेळी 10 पोती भरून प्लॅस्टिक च्या बाटल्या, व प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला.गोळा करण्यात आलेला कचरा स्थानिक वेल्हे गावचे सरपंच संदीप नगीने यांच्याकडे सुपूर्द केला.सरपंचानी या कचऱ्याचे ग्रामपंचायत मार्फत विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घेतली.त्यासोबत दिवाळी नंतर पर्यटक साठी चेक पोस्ट उभारून प्लॅस्टिक बाटली व प्लॅस्टिक पुड्यासाठी अनामत जमा करून घेणार तसेच पुन्हा बाटली पुड्या चा कचरा दाखवून अनामत परत देणार असा मानस बोलून दाखवला.

सर्व दुर्गप्रेमी व हौशी पर्यटकाना आवाहन करण्यात येते की गडावर प्लॅस्टिक कचरा करू नये.गडाचे पावित्र्य व निसर्ग च सौंदर्य अबाधित ठेवावे .

स्वराज्य संघ , महाराष्ट्र राज्य

Previous articleश्री चक्रधरस्वामी अवतरण दिन अष्टशताब्दी जयंती महोत्सव साजरा
Next articleहवेली प्रांतसाठी जोरदार फिल्डींग,पद एकच मात्र इच्छूक अनेक असल्याने ‘पेटी’ तला भाव खोक्यात