श्री चक्रधरस्वामी अवतरण दिन अष्टशताब्दी जयंती महोत्सव साजरा

अमोल भोसले- पुणे

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात भ्रमण करुन “मराठी भाषेत “जीवांना ज्ञान दिले. ते ज्ञान सर्वज्ञ श्रीचक्रधर अवतार दिनाच्या माध्यमातून एवं कार्यक्रमाद्वारे समाजातील तळागळापर्यंत पोहचविण्याचा उद्देश कार्यक्रमाच्या आयोजकांचा असतो म्हणून याठिकाण वरुन जातांना आपण चांगले विचार घेऊन ते आत्मसात करण्याचा प्रयत्न सदभक्तानी करावा असे आवाहन महंत जयराज शास्त्री तळेगावकर यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.

अखिल भारतीय महानुभाव परिषद अंतर्गत पुणे जिल्हा महानुभाव परिषद यांच्या विद्यमाने सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी अवतरण दिन अष्टशताब्दी जयंती महोत्सव कासारसाई याठिकाणी नुकताच साजरा झाला.

यावेळी पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष महंत मुकुंदराज बाबा कपाटे, महंत विश्वनाथ बाबा कारंजकर रुध्दपुर, परिषद कार्याध्यक्ष महंत संदीप दिवाकर बाबा, महंत रामचंद्र बाबा, महंत बायराज बाबा, महंत दत्तराज बाबा, महंत गवळणकर, चक्रपाणी बाबा, रवींद्रमुनी पंजाबी, राजेंद्र भोजने, लाड बाबा, तपस्वनी उज्वला तळेगावकर, लक्ष्मण दवणे, संजय वनारसे, मोहन कदम आदी संत – महंत – तपस्वनी सदभक्त उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळत अगदी मोजक्या लोकांच्या कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleखेड तालुक्यातील किवळे येथे किरकोळ वादातून मित्राचा गळा चिरून खून ; आरोपी २४ तासात जेरबंद
Next articleकिल्ले तोरणा गडावर स्वराज्य संघाच्या वतीने स्वच्छता