काळूसमध्ये सिंजेंटा कंपनीतर्फे मधूमका (स्वीटकॉर्न) पीक चर्चासत्राचे आयोजन

चाकण- खेड तालुक्यातील टेमगिरवाडी (काळूस) येथे सिंजेंटा कंपनीमार्फत मधूमका (स्वीटकॉर्न) या पिकाच्या आधुनिक वाणाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच गोरक्ष टेमगिरे यांच्या शेतात सिंजेंटा कंपनीच्या टॅंग – ७५ या आधुनिक वाणाची लागवड केली होती. पिकाची गुणवत्ता, उत्तम नियोजन व व्यवस्थापनाबाबत जाणून घेण्यासाठी खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील अनेक शेतकरी या चर्चासत्राला उपस्थित होते.

यावेळी सिंजेंटा कंपनीतील वरिष्ठ अधिकारी दिनेश निचत, अरुण देशमुख व तुषार डावखर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी सहाय्यक माने, भूमी ऍग्रो प्रोसेसिंगचे रुपेश अरगडे व विक्रेते अशोक काळे हे देखील उपस्थित होते.

महाराष्ट्र कृषी उद्योग समूहाचे दत्ता भानापुरे, वेताळ कृषी सेवा केंद्राचे सुनील दौंडकर, सौरभ तांगडकर व विशाल पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्व शेतकऱ्यांनी नवीन वाणाबद्दल समाधान व्यक्त केले. संपत टेमगिरे यांनी आभार व्यक्त केले.

Previous articleआमदार भिमराव तापकीरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खडकवासला ते कोल्हेवाडी रस्त्याचे भूमिपूजन
Next articleउरुळी कांचन मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त