उत्तमनगर परिसरात अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी

अतुल पवळे, खडकवासला

उत्तमनगर परिसरात बॅंक ऑफ इंडियाच्या वरती अज्ञात चोरट्यांनी तीन घरात रात्रीच्या वेळी घुसून घरफोडी करून कॅश व सोने लंपास केली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या ठिकाणी तळावर सरकारी बॅंक व एटीएम असल्याने सुरक्षा रक्षक आहे तसेच बाजूला लागूनच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सारखी सगळ्यात मोठी राष्ट्रीय संरक्षण संस्था देखील हा प्रकार होतो, म्हणजेच हे चोरटे आजूबाजूचेच असले पाहिजे. ज्यांना ह्या परिसरातील माहिती आधीपासूनच असली पाहिजे. हे चोरटे रात्री १ते २ च्या सुमारास या बिल्डिंगमध्ये शिरून ३ ठिकाणी घरफोडी करून दीड ते दोन लाखाची रोक रक्कम व सोने घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. आता या परिसरातील प्रत्येक नागरिकाला यापुढे सावध राहायला हवे.हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे परंतु चोरट्यांनी चेहरा संपूर्ण झाकल्याने ते ओळखू येत नाही.

Previous articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला धामणे शाळेला स्लॅब
Next articleपुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे यांच्या माध्यमातून सिंहगड खोऱ्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी