जुन्नर तालुक्यात आज सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न

 तालुक्याची कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या झाली ३८९

नारायणगाव (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून आज रोजी एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निष्पन्न झाले आहेत. आजपर्यंत जुन्नर तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या ३८९ एवढी झाली असून आजपर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यापैकी २४३  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या  १३१  एवढी आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

आज नारायणगाव येथे दोन रुग्ण तर खामुंडी, ओतूर, आळे, आगर व जुन्नर येथे प्रत्येकी एक असे सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
दरम्यान सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.

Previous articleडॉ.रणजित थोरात व परिवर्तन सोशल फाउंडेशन तर्फे दौंड तालुक्यात आर्सेनिक अलबम 30 गोळ्यांच्या 25000 बॉटल चे वाटप
Next articleअष्टविनायक पैकी महत्त्वाच्या असलेल्या ओझरच्या मंदिरात चोरी