खुरपुडीत माती माफीयांचा धुमाकूळ

राजगुरुनगर:  खरपुडी ( ता खेड ) येथे विनापरवाना सुरू असलेले गौण खनिज उत्खनांची चोरी रोखण्यासाठी तलाठी व कोतवाल गेले असता त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ६जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत तलाठी स्वाती चंद्रकांत तावरे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की,खरपुडी (ता खेड )येथील मांडवळा येथे चासकमान धरणाचा डाव्या कालव्यालगत गट क्रमांक ४२४ या गटात बेकायदेशीरपणे विनापरवाना गौण खनिजाचे पोकलॅण्ड द्वारे उत्खनन करून गौन खानिजाची चोरी सुरू होती. याबाबत तलाठी तावरे यांना माहिती मिळाली होती.घटनास्थळी ही होणारी चोरी रोखण्यासाठी व पंचनामा करण्यासाठी तलाठी तावरे व कोतवाल दत्तू छबू चव्हाण हे गेले होते. दरम्यान यातील आरोपी महेंद्र काळुराम भोगाडे ,श्रीधर दगडु चौधरी, प्रविण श्रीधर चौधरी,प्रसाद जालींदर चौधरी, व इ(तर दोघे जण नांव पत्ता माहिती नाही )हे सर्व (रा. खरपुडी बुद्रुक ,ता.खेड यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवुन विना परवाना गौण खनिजांची चोरी करत होते त्यांना पोकलॅण्ड बंद करण्यास सांगितले असता कोतवाल दत्तू चव्हाण यांना ढकलुन दिले. तलाठी तावरे यांना शिवीगाळ दमदाटी केली पंचनामा करताना सरकारी कामकाजात अडथळा आणला. तसेच उत्खनासाठी वापरण्यात पोकलॅण्ड मशीन व डंपर जप्त न करुन देता दमदाटी करून तेथून हलविले.

दरम्यान तावरे यांनी सदर जागेचा पंचनामा करत त्याठिकाणी माती, मुरुम व दगड या गौण खनिजाचे उत्खनन झाले असल्याचा अहवाल तहसीलदार सुचित्रा आमले यांना सादर केला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीसनिरीक्षक निलेश बडाख करत आहे.

Previous articleपत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल होऊ नयेत अशी” जुन्नर तालुक्यातील पत्रकारांची मागणी
Next articleडॉ.रणजित थोरात व परिवर्तन सोशल फाउंडेशन तर्फे दौंड तालुक्यात आर्सेनिक अलबम 30 गोळ्यांच्या 25000 बॉटल चे वाटप