‘शिक्षक’भावी पिढीचे शिल्पकार-राहूल वांजळे

अतुल पवळे, पुणे

सांगरूण (ता.हवेली) दि.६ सप्टेंबर २०२१- परिवर्तन प्रतिष्ठान, पुणे आयोजित शिक्षक दिन सोहळा सिंहगड विद्यालय, सांगरूण येथे साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’म्हणून साजरा करण्यात येतो. ‘शिक्षक’हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्याला गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
सिंहगड विद्यालय सांगरूण व जिल्हा परिषद शाळा, सांगरूण येथील शिक्षक व सेवकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलत असताना राहूल वांजळे म्हणाले की, शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्वज्ञ, पुढारी, डाॅक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आईवडिलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरीत्या पालकच असतात.

यावेळी या कार्यक्रमासाठी राहूल वांजळे परिवर्तन प्रतिष्ठान अध्यक्ष, रोहिणी वांजळे उपसरपंच अहिरेगाव,महेंद्र गायकवाड सरपंच सांगरूण, संदीप धोत्रे ग्रामसेवक सांगरूण, सिताबाई मानकर मा. सरपंच सांगरूण, नामदेव मानकर मा. उपसरपंच सांगरूण, विकी मानकर उपसरपंच सांगरूण, तेजस राऊत ग्रामपंचायत सदस्य सांगरूण, डाॅ.अनिल जोशी वैद्यकीय अधिकारी सांगरूण, ज्ञानेश्वर मानकर, जे. डी काळेल मुख्याध्यापक सिंहगड विद्यालय सांगरूण, पवार मॅडम मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगरूण व शिक्षक, सेवक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleकृषी कन्येकडून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे
Next articleखरपुडीच्या पंडीत गाडे यांच्या धाडसाचा धर्मराज पवळे यांनी केला सन्मान