कृषी कन्येकडून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीकन्या नेहा वाल्मिक घोडके हिने शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली तसेच ठिबक सिंचन काळाची गरज आहे,यामुळे पाण्याची बचत होऊन कमी पाण्यात भरघोस उत्पादन कसे घ्यायचे याविषयी प्रशिक्षण दिले.

तसेच प्रगतशील शेतकरी तुळशीदास बुऱ्हाडे यांच्या कांदा वखार येथे जाऊन आधुनिक कांदा प्रक्रियेचे तंत्र याविषयी देखील कृषीकन्या नेहा घोडके यांनी मार्गदर्शन केले यावेळी शोभा शेंडे,अश्विनी शिंदे,अनिता बुऱ्हाडे,कमल काळे,विमल मोरे व इतर शेतकरी उपस्थित होते हा मार्गदर्शन कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी.पी. कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलावडे,कार्यक्रम अधिकारी एस.एम. एकतपुरे, विषय शिक्षक प्रा.डी. सी.मेटकरी,प्रा.एस.आर.आडत,प्रा.डॉ.डी.एस.ठवरे,यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Previous articleशिरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कांताबाई अरगडे यांची बिनविरोध निवड
Next article‘शिक्षक’भावी पिढीचे शिल्पकार-राहूल वांजळे