शिरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कांताबाई अरगडे यांची बिनविरोध निवड

पवनानगर – मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कांताबाई बाबूराव अरगडे याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निशा अरगडे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मंगल गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.सभेत ग्रामसेवक सुवर्णा सुरवडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

 सरपंच मंगल गोपाळे,सदस्य अमोल गोपाळे,मारुती गोपाळे, वंदना गोपाळे,पल्लवी गोपाळे, निशा अरगडे, श्वेता गोपाळे, केदार वाघमारे,उद्दोजक राहुल अरगडे यांच्या सह अनेक जण उपस्थितीत होते.निवडीनंतर पेढे भरुन आंनद उत्साह साजरा केला.

यावेळी अरगडे यांनी बोलताना सांगितले कि गावामध्ये विविध विकासकामांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून विकास कामे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Previous articleराजगुरूनगरच्या गिर्यारोहकांचा मोरोशीच्या भैरवगडावरुन तिरंगा फडकावून गुरुजनांना सलाम
Next articleकृषी कन्येकडून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे