महा आवास ग्रामीण पुरस्काराचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वितरण

पुणे- महा आवास ग्रामीण पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद पुणे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला.

दिपक नाथानी यांच्या ‘रेल्फोर फाउंडेशन’ तर्फे शबरी घरकुल योजने अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी पुणे जिल्ह्यातील अमदाबाद येथे अति उत्कृष्ट दर्जाची पक्की ३० घरे बांधून देण्यात आली त्यांच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते महाआवास योजना पुरस्कार देण्यात आला.

रेल्फोर फाउंडेशन द्वारे सासवड, शिरूर, खेड, बारामती व जालना जिल्ह्यात ३ कोटी खर्च करून तलाव खोलीकरणाची कामे करण्यात आली असून आत्तापर्यंत १०० पक्की घरे आदिवासी बांधवांसाठी बांधून देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत सामाजिक कामगिरीसाठी शुभेच्छा देऊन मदतीचे आश्वासन दिले.

Previous articleमूल्यशिक्षण काळाची गरज- ज्योती दवणे
Next articleमाझ्याकडेही कृषी खातं होतं पण शेतकऱ्यांवर रस्त्यावर शेतमाल टाकण्याची वेळ येऊ दिली नाही – शरद पवार