भाजपाच्या किसान मोर्च्याच्या तालुकाध्यक्षपदी रतन मांडेकर यांची निवड

चाकण- खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्च्याच्या तालुकाध्यक्षपदी आंबेठाण येथील जेष्ठ कार्यकर्ते रतन सीताराम मांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या किसान मोर्च्याच्या मेळाव्यात रतन सीताराम मांडेकर यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील,अतुल देशमुख,तालुका अध्यक्ष शांताराम भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा किसान मोर्च्याच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मला मिळविलेल्या पदाचा उपयोग करणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्षा रतन मांडेकर यांनी सांगितले.

Previous articleमुळशीत ई पीक पाहणीला प्रारंभ
Next articleअभिनेत्री ईला भाटे यांची रामभाऊ म्हाळगी विद्यालयाला भेट