पनवेल येथील साई ट्रेंडिंग कंपनीचे मालक सुनील गोरे व बाळू गोरे यांच्या वडिलांचे दुःखद निधन

अतुल पवळे, पुणे

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील साई ट्रेंडिंग कंपनीचे मालक सुनिल गोरे व बाळू गोरे यांच्या वडिलांचे दुखद निधन झाले.स्व कुशाबाप्पू गोरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असले तरी गोरे कुटुंबातील आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. या निधनाची बातमी समजताच पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील यांनी त्यांच्या मुळगावी म्हणजेच मुक्काम रूईछत्तीसी ता अहमदनगर येथे जाऊन सांत्वनपर भेट दिली. संतोष पाटील यांचे व गोरे कुटुंबीयांचे अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे ही दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या सुखदुखात सहभागी असतात.

याप्रसंगी संतोष पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, अमित म्हात्रे हरिग्राम ग्रामपंचायत मा.सरपंच, पंडीत भोईर युवा नेते शेकाप, सुभाष जळे शिवसेना उपशाखा प्रमुख हरिग्राम, कु. साहील संतोष पाटील पनवेल तसेच रूईछत्तीसी गावातील प्रमुख मान्यवर व गोरे परिवाराचे जवळील नातेवाईक उपस्थित होते. याप्रसंगी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती व पनवेल शहर, हरिग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने स्व कुशाबाप्पू गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व गोरे कुटुंबाच्या या दुखात सहभागी असल्याची भावना संतोष पाटील यांनी व्यक्त केली.

Previous articleनारायणगाव येथील फुटबॉल स्पर्धेत स्पार्टन फुटबॉल क्लब विजयी
Next articleवारूळवाडी व नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविड लसीकरण मोहिमेत ३२०० जणांना लस