गटशिक्षण अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना पकडले

अतुल पवळे,पुणे

पुणे जिल्हा परिषदेतील गट शिक्षण अधिकारी व त्यांच्या खासगी व्यक्तीला पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ५० हजारांची लाच घेताना पकडले आहे. या शिक्षण अधिकाऱ्यांचे  नाव रामदास वालझडे असून, जिल्हा परिषदेच्या इमारतीत सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागात प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे.

पुन्हा एकदा पवित्र शिक्षण क्षेत्राला काळीमा फासल्याचा प्रकार समोर आला. संबंधित कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरटीई मार्फत शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच मागितली गेली. अशी माहिती देण्यात आली आहे. तक्रारदार यांनी एसीबीकडे संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली होती. संबंधित तक्रारीची पडताळणी करून, एसीबीने सापळा रचत संबंधित अधिकाऱ्याला ५० हजाराची लाच घेताना पकडले आहे.

Previous articleदावडीचे सरपंच संभाजी आबा घारे यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून पैश्याची मागणी
Next articleदौंड पोलिसांची वाळू माफियांवर कडक कारवाई