दावडीचे सरपंच संभाजी आबा घारे यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून पैश्याची मागणी

राजगुरूनगर- दावडीचे सरपंच संभाजी आबा घारे यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरपंच संभाजी आबा घारे यांनी याबाबत माहिती दिली आहे

संभाजी साबा घारे ( sambhaji Saba Ghare sarpanch) या नावाने कोणी तरी अज्ञात व्यक्तीने फेसबुक द्वारे अकाऊंट उघडून 8000 हजार रूपयांची मागणी केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .  869687329  या  नंबरवर फोन पे व्दारे हा भामट्यांना पैसे मागत असल्याचे समोर आले आहे. यावर मी कायदेशीर तक्रार करणार असल्याचे सरपंच घारे यांनी सांगितले. कोणीही या खोट्या पणाला बळी पडू नका आणि समाजात अश्या प्रकारे कारस्थान करणाऱ्या व्यक्तीनं पासून सावध राहण्याचे आवाहन सरपंच संभाजी आबा घारे यांनी केले आहे

Previous articleविद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक
Next articleगटशिक्षण अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना पकडले