हवेली तालुका पत्रकार संघाच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी गणेश सातव यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई अंकित महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ अंतर्गत हवेली सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी गणेश बापुसाहेब सातव यांची तर कार्याध्यक्षपदी विजय बबन काळभोर, सचिवपदी सुवर्णा कैलास कांचन,उपाध्यक्षपदी सचिन विवेक माथेफोड, खजिनदारपदी सोहम संदेश जगताप, तालुका समन्वयकपदी श्रीनिवास अशोक पाटील, कार्यकारणी सदस्यपदी चेतन नारायण दिघे, सुनील बाळकिसन गोयल, डॉ. मोहन भाऊराव वाघ, सुनील सुरळकर ( धिवार ), धनंजय लक्ष्मण मदने यांची नुकतीच निवड जाहीर केली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र देऊन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर राज्य निमंत्रक महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी सदरच्या निवडी जाहीर केल्या.

हवेली तालुका सोशल मिडिया संघ व दौंड तालुका सोशल मिडिया संघ शाखा संघ उद्घाटन सोहळा उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील मेमाणे फार्म या ठिकाणी एस. एम. देशमुख यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी अ.भा.म.प.परिषद कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष जनार्दन दांडगे, जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, तालुकाध्यक्ष राजेंद्र काळभोर, तालुका उपाध्यक्ष जयदीप जाधव, दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी खोरकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, तुळशीराम घुसाळकर , प्रभाकर क्षिरसागर, दादाराव आढाव, किशोर मेमाणे, अनिल वडगुले, रमेश वत्रे, दिपक पवार, जितेंद्र आव्हाळे, सुखदेव भोरडे, चंद्रकांत दुडे, सचिन सुबे, अमोल आढागळे, दत्तानाना भोंंगळे, अमोल बनकर, के.डी. गव्हाणे,राहुल शिंदे, सुनिल वाळुंज, राजेंद्र शिंदे, जीवन शेंडकर, सुशांत जगताप, आदी हवेली- पुरंदर- दौंड तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक सुनिल जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन आभार तालुकाध्यक्ष गणेश सातव यांनी केले.

पत्रकार संघाच्या वरिष्ठांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सर्व मिळवून सार्थ ठरवु असे नुतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous articleशिवभक्त पै.अनिकेत घुले यांना शिवनिश्र्चल पुरस्कार जाहीर
Next articleविद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक