शिवभक्त पै.अनिकेत घुले यांना शिवनिश्र्चल पुरस्कार जाहीर

पवनानगर-नाशिक येथील शिवनिश्र्चल सेवाभावी ट्रस्टच्या दरवर्षी देण्यात येणार शिवनिश्र्चल पुरस्कार यंदा मावळ तालुक्यातील पै.अनिकेत घुले यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या ५ स्प्टेंबरला देण्यात येणार आहे. नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत घुले यांचा पुरस्कार गौरव करण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी सांगितले की अनिकेत घुले हे दरवर्षी शिवनेरी ते रायगड पालखी सोहळा आयोजित करुन शिवकार्य तरुणपिढीपर्यत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. तरुणांनी व्यसनाच्या आहरी जाण्यापेक्षा व्यायामाकडे वळवावे.हा संदेशही तरुणांना देत आहे.

गाव तिथे शिवराय आणि भीमराय हि संकल्पही ते राबवित आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात सत्कार करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती भेट करण्याचे आवाहन ते करतात.दान स्वरुपात मिळालेल्या मुर्ती गावातील तरुण मंडळांना देण्याचा चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या माध्यमातून प्रत्येक गावात या दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावी.यासाठी अनिकेत घुले प्रयत्नशील आहेत. लाँकडाऊन, महापुरासारख्या काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची शिवनिश्र्चल पुरस्कारासाठी निवड केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांनी सांगितले.

Previous articleधक्कादायक ; बिबट्याच्या हल्ल्यात 60 वर्षीय महिला ठार
Next articleहवेली तालुका पत्रकार संघाच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी गणेश सातव यांची निवड