धक्कादायक ; बिबट्याच्या हल्ल्यात 60 वर्षीय महिला ठार

राजगुरूनगर- वडगाव पाटोळे (ता.खेड) येथील 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला. यामध्ये जनाबाई वामन गडदे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वडगाव पाटोळे येथे शेतातील झोपडीत जनाबाई गडदे यांच्यावर रात्री बिबट्याने हल्ला करून लचके तोडले . ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या गावकऱ्यांनी केल्या आहे. बिबट्याकडून नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे वन विभाग येथे तत्काळ पिंजरा लावावा,अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

Previous articleअक्षय बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलिस स्थानकामध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Next articleशिवभक्त पै.अनिकेत घुले यांना शिवनिश्र्चल पुरस्कार जाहीर