राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दौंडमध्ये सायकल रॅली

दिनेश पवार,दौंड

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दौंडमध्ये मार्शल आर्ट बॉक्सीग अँड कराटे ट्रेनिंग स्कूल दौंड च्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त मशाल ज्योत व सायकल रॅली काढण्यात आली. या रॅली साठी विद्यार्थी,खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकवर्ग हि उपस्थित होते.

या रॅलीचे उदघाटन दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शितल ताई कटारिया,नगरसेविका अरुणा डहाळे , डॉ रोहन खवटे, जालिंदर आवारी सर,राजेंद्र साळवे सर या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

 विद्यार्थांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच रॅली च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, कोरोना विषयी खबरदारी, खेळाचे महत्व,कन्या साक्षरता आशा महत्वपूर्ण विषयावर सुंदर संदेश देण्यात आले या रॅली चे आयोजन संतोष सोनवणे सर यांनी केले होते. विशेष सहकार्य हिरालाल साळवे,गणेश फुंडे,कृष्णा आडागळे,श्रुती कटारिया,विद्या पोकर,सागर रकटे,संदीपन बनिक यांचे लाभले

Previous articleराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दौंडमध्ये सायकल रॅली
Next articleअक्षय बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलिस स्थानकामध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल