युनिट ऑफ द मंथ पुरस्काराने युनिट ६ चा गौरव

गणेश सातव,वाघोली, पुणे

पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत असणाऱ्या गुन्हे शाखा युनिट- ६ ला ‘युनिट ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरिक्षक गणेश माने व सर्व पोलीस कर्मचारी वृंदांचा सदर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दर महिन्यात सर्व गुन्हे शाखांच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येते.केलेल्या मुल्यमापनात गुन्हे शाखा युनिट ६ ने धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर पुरस्काराची मोहर उमटवली आहे.

यावेळी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,उपायुक्त श्रीनिवास घाडगे उपस्थित होते.

Previous articleपोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा सन्मान
Next articleराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दौंडमध्ये सायकल रॅली