पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा सन्मान

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार निवारण भारत च्या वतीने सन्मान करण्यात आला, पदभार स्वीकारलेल्या पहिल्याच दिवशी विनोद घुगे यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू केली तसेच बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक नागरिकांनी शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असेही यावेळी सांगितले,यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार चे महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष दस्तगिर इनामदार,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष व देऊळगाव राजे चे उपसरपंच बाबू पासलकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित डाळींबे,सामाजिक कार्यकर्ते सचिन माने,पुणे जिल्हा मीडिया प्रभारी दिनेश पवार उपस्थित होते

Previous articleदौंड पोलिसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई
Next articleयुनिट ऑफ द मंथ पुरस्काराने युनिट ६ चा गौरव