लोणी काळभोर- वनविभागाच्या जागेमध्ये साकारणार ” देवराई ” प्रकल्प

अमोल भोसले,उरुळी कांचन

वृक्षारोपण हि काळाची गरज असून त्या बरोबरच प्लॅस्टिकमुक्त गाव हि संकल्पना आगामी काळात राबवण्याची गरज आहे असे प्रतिपादन जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज हभप शिवाजी महाराज मोरे यांनी केले.

हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या प्रेरणेने हवेली तालुका वनविभाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हडपसर भाग, हवेली तालुका पत्रकार संघ, ग्रीन फाऊंडेशन, जयहिंद ग्रुप, पर्यावरण संरक्षण समिती व संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील कोळपे वस्ती, लोणी काळभोर ( ता. हवेली ) येथे वनविभागाच्या एक एकर जागेमध्ये वृक्षारोपणाचा ” देवराई ” प्रकल्प राबविण्यात येत आहे. येथील वृक्षारोपणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या वेळी हभप विनोद महाराज काळभोर, देवराईचे संस्थापक आर एम ढोले, वनविभागाचे आधिकारी एम व्ही सपकाळे, जागृती सातारकर, हवेली तालुका शिवसेनेचे प्रमुख प्रशांत काळभोर, जयप्रकाश कदम, हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर काळभोर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघसंचालक दत्तात्रय खेडेकर, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, युवा नेते अमित काळभोर, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सचिन काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, राहुल काळभोर, हरिश गोठे, पोलीस पाटील प्रियांका भिसे, भाजपचे सुदर्शन चौधरी, प्रविण काळभोर, कमलेश काळभोर, रासपचे तालुका सचिव विनोद राहिंज, पंचायत समितीचे माजी सदस्य मल्हारी कोळपे, शिवसेनेचे रमेश भोसले, राजेश काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, हेमंत हाडके, ग्राहक संरक्षण समितीचे सूर्यकांत गवळी, अविनाश बडदे, जालिंदर रुपनर, मल्हार पांडे, महेश खुळपे, नितीन कोलते, अमित जगताप आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना ह.भ.प शिवाजी महाराज मोरे पुढे म्हणाले आपल्या कडे प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. तो शंभर टक्के बंद करून कापडी पिशवीचा वापर वाढवण्याची गरज आहे. या संदर्भात लोणी काळभोर ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतल्यास या संदर्भात मी गावक-यांना चांगली मदत करु शकतो. देवराईचे संस्थापक आर एम ढोले यावेळी बोलताना म्हणाले गेल्या काही वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात ८० देवराई तयार केल्या आहेत. आगामी काळात राज्यात १००० देवराई बनविण्याचे नियोजन केले आहे. आपल्या यापुर्वीच्या ४०० पिढ्यांनी वेगवेगळ्या गरजांसाठी वृक्षतोड केली आहे. हि भरपाई करण्यासाठी आपण प्रत्येकाने किमान १० झाडे लावली पाहिजेत.

या वेळी प्रशांत काळभोर, युगंधर काळभोर, नागेश काळभोर, सुदर्शन चौधरी, सूर्यकांत गवळी यांनीही आपले विचार मांडले. सुत्रसंचालन मल्हार पांडे यांनी तर उपस्थितांचे आभार राजेंद्र हजगुडे यांनी मानले.

Previous articleनागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम महानगर विकसीत करताना आराखड्यांमध्ये सूचनांचा अंतर्भाव करावा -उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleलोणी काळभोर येथे वनविभागाच्या जागेमध्ये वृक्षारोपणाचा ” देवराई ” प्रकल्प