राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या कार्यध्यक्षपदी संध्याताई शिंदे यांची नियुक्ती

बाबाजी पवळे, चाकण- राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या कार्यध्यक्षपदी संध्याताई शिंदे यांची नियुक्ती पुणे विभागाच्या अध्यक्षा मीनाताई शिंदे यांनी केली आहे.त्यांच्या कार्यध्यक्षपदी निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष मीनाताई मोहिते यांना त्यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी असंघटित कामगार विभागाच्या पुणे जिल्हा अध्यक्षा मिनाताई मोहिते, यावेळी नितीन गायकवाड पुरुष पुणे जिल्हा, कार्याध्यक्ष जयश्री प्रसाद,पुणे जिल्हा उपाध्यक्ष गायत्री असवले,पुणे जिल्हा सचिव महिला अँड. इंगळे, कायदेविषयक सल्लागार पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सलीम अत्तर,सदस्य भूषण शिरसाठ, अरुण अवधूत आदी मान्यवर उपस्थित होते

असंघटित कामगारांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी शिंदे यांनी दिली. असंघटित कामगारांवर राज्यभरात अन्याय होत आहे. समाजातील एका प्रकारे असंघटित कामगारांना न्याय मिळत नाही. संस्थांकडून त्यांची पिळवणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मोठी कामगार ताकद आहे. या कामगारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्कीच न्याय देईल, अशी खात्री संध्याताई शिंदे यांनी दिली.

Previous articleवाघांच्या शेळीवर बिबट्याने डल्ला मारला
Next articleनगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार