कोरोना संकटातही कृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह कायम

चाकण- दिव्य ज्योती जागृती संस्थान कडून साजरा होणार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव या उत्सव मधील धार्मिक कार्यक्रम व थेट प्रक्षेपण आपल्याला ऑनलाइन पाहता येणार असल्याची माहिती सदस्यांनी दिली आहे.

घरबसल्या बघता येणार डीजेजेएस श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव २०२१ विशेष,
“संभवामी युगे युगे”

‘डी जे जे एस जन्माष्टमी महोत्सव’ अतिविशेष असून हा कार्यक्रम फक्त भगवान श्रीकृष्णांची मटकी फोड किंवा भजन संकिर्तना पुरतीच नसून रोमांचकारी नृत्यनाटिका संगीतमय प्रस्तुती व ज्ञानवर्धक अध्यात्मिक प्रवचनाचा अद्वितीय संगम असणार आहे.यामध्ये दिव्य गुरु श्री आशुतोष महाराज यांच्या ब्रह्मज्ञानी शिष्यांद्वारा प्रस्तुत नृत्यनाटिका ज्या आपल्याला पुन्हा द्वापार-युगात घेऊन जाणार तर दुसरीकडे गुरुदेवांच्या ब्रह्मज्ञानी संन्यासी शिष्यांकडून अध्यात्मिक प्रवचन आपल्याला श्रीकृष्णलीला मध्ये निहित शाश्वत ज्ञानाची आजच्या सामाजिक परिवेशामध्ये जी उपयोगिता आहे त्याच्याशी परचीत करून देणार आहे.

दिव्य ज्योती जागृती संस्थान गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी हा महोत्सव केवळ मात्र बाह्य स्वरूपा मध्येच नाही तर त्यामध्ये निहित वास्तविक भावनेने साजरा करीत आहे.या भव्य आयोजनामध्ये लाखो दर्शक सम्मिलित होतात डीजेजेएस च्या प्रतिनिधींनी सांगितले की,भगवान श्री कृष्णा प्रति समाजामध्ये व्याप्त मिथ्या धारणा आणि भ्रामक कल्पनांना दूर करणे व श्रीमद्भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण द्वारा दिल्या गेलेल्या अध्यात्मिक प्रयोगात्मक विज्ञान ब्रह्मज्ञानाची लोकांना परिचित करण्याच्या उद्देशाने गुरुदेव सर्वश्री आशुतोष महाराज यांनी स्वतः या कार्यक्रमाला आकार दिला आहे.

हे आयोजन कोणत्या विशेष वयोगटासाठी सीमित नसून हा कार्यक्रम प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे हा एक असा कार्यक्रम आहे जो आपण आपल्या परिवारासोबत बघू शकतो आणि जीवन उपयोगी गुड अध्यात्मिक शिक्षा प्राप्त करू शकतो या भव्य कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी डी जे जे एस यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून श्री श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद घ्यावा,
भक्तगणांनी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.

समस्त भक्तानां आव्हान करण्यात येत आहे की, प.पु. सर्वश्री आशुतोष महाराज जी ” यांच्या अनंत कृपाशीर्वादने दिव्य ज्योति जाग्रति संस्थान द्वारा श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव-2021चे भव्य आयोजन ‘संभवामि युगे युगे’ या नावाने केले आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सर्वश्री आशुतोष महाराज जी यांचे शिष्यांचे माध्यमातून आध्यात्मिक प्रवचन, नृत्य व नाटिका चे आयोजन केले आहे तरी आपण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती !

रविवार 29 ऑगस्ट 2021
वेळ : सकाळी 10 : 00 ते 11:30 वा.

रात्री : 9:00 ते 10:30 वा.

दिनांक : सोमवार 30 ऑगस्ट 2021

वेळ : सकाळी 10 ते 12 वा.
रात्री: 9.00 ते 12.00 वा.

DJJS YouTube Channel: https://youtube.com/djjsworld

Previous articleखेडमध्ये ‘ई- पीक पाहणी’ जनजागृती अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleयुट्यूब चॅनल्स, पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करा : एस एम देशमुख