वाघांच्या शेळीवर बिबट्याने डल्ला मारला

नारायणगाव (किरण वाजगे)

पिंपळवंडी (तालुका जुन्नर) येथील निखिल वसंत वाघ यांच्या शेतामध्ये चरायला सोडलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना २६ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. आडनाव वाघ असलेल्या शेतकऱ्यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरामध्ये “वाघांच्या शेळीवर बिबट्या ने डल्ला मारला” अशी एकच चर्चा गंमतीशीर पणे सुरू झाली.

दरम्यान वाघ यांची एक शेळी बिबट्याने ठार मारली याबाबत वन विभागाचे श्री विभुते व बाबाजी खर्गे यांनी घटनेचा पंचनामा केला असून या परिसरात दोन बिबटे वावरत असल्याचे निखिल वाघ यांनी सांगितले. अनेक वेळा येथे बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले होताहेत म्हणून येथे बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

Previous articleसंभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेता तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या कार्यध्यक्षपदी संध्याताई शिंदे यांची नियुक्ती