येलघोल येथे कोवीडचे लसीकरण

पवनमावळ- परिसरातील ग्रामीण भागातील येलघोल गावामध्ये कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये १५५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.ग्रामीण भागामध्ये वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी सुविधा नसल्याने येलघोल ग्रामपंचायत चे सरपंच जयवंत घारे यांच्या पुढाकाराने व प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये लसीकरण लसीकरण करण्यात आले यामध्ये महिला,पुरुष यांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करुन घेतले आहे.

यावेळी सरपंच जयवंत घारे,सुप्रिया मेश्राम,डाँ.राजेंद्र मोहिते,डाँ.सागर क्षिरसागर, राहुल जाधव,यांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात आले आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान – नवाब मलिक
Next articleयेलघोल येथे कोवीडचे लसीकरण