जनआशिर्वाद यात्रा कशासाठी… पेट्रोल – डिझेलच्या व गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

अमोल भोसले,पुणे

जनआशिर्वाद यात्रा कशासाठी… पेट्रोल – डिझेलच्या व गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून …आशिर्वाद कशासाठी जनतेने द्यायचा यांना असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विचारला आहे.

भाजपने जनआशिर्वाद यात्रा सुरू केली असून यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

या देशात कधी केंद्रीयमंत्री झाले नाहीत का? की केंद्रीयमंत्री कुणी कधी बघितले नाहीत त्यामुळे ही जनआशिर्वाद यात्रा हास्यास्पद असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

भाजप जनआशिर्वाद यात्रा घेण्यासाठी जात आहेत. त्यावेळी लोकंच विचारत आहेत आता हे मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायला निघालेले लोकं आहेत त्यामुळे लोकं घाबरतात. आता घरात बसून मतदान येईल त्यावेळी निषेध व्यक्त करतील असा विश्वासही जयंत

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे नारायणगावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध
Next articleमुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान – नवाब मलिक