लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगरचा पदग्रहण समारंभ उत्साहात 

 

 

राजगुरुनगर :येथील लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगरचा शपथविधी व पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. सन २०२१-२२ या वर्षासाठी अंबर वाळुंज यांनी अध्यक्ष म्हणून, मनिष बोरा यांनी सचिव व पत्रकार अमितकुमार टाकळकर यांनी खजिनदार पदासाठी शपथ घेतली.

 

 

 

याप्रसंगी माजी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल दिपक शहा, पदग्रहण अधिकारी म्हणून प्रथम उपप्रांतपाल राजेश कोठावदे तर शपथविधी अधिकारी म्हणून माजी जिल्हा खजिनदार संतोष सोनावळे यांच्यासह रिजन चेअरपर्सन राजश्री शहा, झोन चेअरमन प्रकाश मुटके आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

 

 

यावेळी कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकार व पॅथॉलॉजी तंत्रज्ञ यांना ‘कोरोना वॉरीयर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच राजगुरूनगर ते गेट वे ऑफ इंडीया पर्यंत सायकल प्रवास करणारे सायकलवीर कृणाल रावळ, सहा वेळा प्लाझ्मा दान करणारे सदाशिव आमराळे व ढोरे-भांबुरवाडीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय ढोरे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त दावडी ग्रामपंचायतीस सुरक्षासाधने व आरोग्य केंद्रास सॅनिटायजर वाटप, विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, चिपळूण येथील पुरग्रस्तांसाठी अकरा हजार एकशे अकरा रूपयांचा धनादेश, अंगणवाडी विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिन व कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप, गरजूंना गॅस सिलेंडर वाटप आदी उपक्रम करण्यात आले.

 

 

यावेळी बोलताना अध्यक्ष अंबर वाळुंज यांनी समाजातील दुर्बल घटकासाठी मदत केली जाईल, असे सांगितले. यावेळी ८ नूतन सदस्यांनी क्लबचे सभासदत्व स्वीकारले.

 

 

कार्यक्रमाचे नियोजन नितीन दोंदेकर, ऍड. संदीप भोसले, रमेश बोऱ्हाडे, मिलिंद आहेर, डॉ. विजय आंबरे, धिरज कासवा यांनी केले. सुत्रसंचालन राजेंद्र गायकवाड व अक्षता कान्हूरकर यांनी केले तर आभार डॉ. सागर गुगलीया यांनी मानले.

Previous articleयुवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगाराची संधी -मंत्री नवाब मलिक
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे नारायणगावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध