पत्रकारांच्या सहकार्याने शांतता प्रस्थापित करणे सोपे झाले-पोलीस निरीक्षक नारायण पवार

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलीस स्टेशनहद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पत्रकार बंधू,पोलीस पाटील,सामाजिक कार्यकर्ते यांचे पोलिसांना योग्य सहकार्य मिळाल्याने कर्तव्य पार पाडणे सोपे झाले, पत्रकारांच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदेश समाजापर्यंत योग्य वेळी वेळोवेळी पोहचल्याने पोलिसांना काम करणे सोयीचे झाले असे मत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी व्यक्त केले.

नारायण पवार यांची यवत येथे नुकतीच बदली झाल्याने त्यांच्या आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते,दौंड येथे कर्तव्य पार पाडताना पवार यांनी सर्वांना विश्वासात घेतले त्यामुळे पोलीस कर्मचारी,पोलीस पाटील,पत्रकार,दौंड मधील सर्व राजकीय,सामाजिक पदाधिकारी यांच्या वतीने आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी पवार यांनी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले तर उपस्थित पत्रकार,पोलीस पाटील व पदाधिकारी यांनी त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Previous articleविहिरीत उडी मारून विवाहितेची आत्महत्या : सात जणांवर गुन्हा दाखल
Next articleपहिल्याच दिवशी पोलीस निरीक्षक घुगे यांचे दौंडकराना शिस्तीचे धडे