विहिरीत उडी मारून विवाहितेची आत्महत्या : सात जणांवर गुन्हा दाखल

नारायणगाव(किरण वाजगे)

वडगाव कांदळी ( ता.जुन्नर) येथील नेहा अमोल पवार( वय २२) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांकडून नवरा, सासू, सासरा,दीर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी विवाहितेचा नवरा अमोल अनंथा पवार,सासरा आनंथा हरिभाऊ पवार,सासू कमल अनंथा पवार, दीर प्रवीण आनंथा पवार, जावु निर्मला प्रवीण पवार, सुप्रिया नितीन पवार, चुलत सासरे भिकाजी हरिभाऊ पवार (सर्व रा. वडगाव कांदळी,ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत ताटे म्हणाले की, वडगाव कांदळी येथील संदीप वसंत पाचपुते यांची मुलगी नेहा व अमोल यांचा विवाह मार्च २०२० मध्ये झाला होता. विवाह नंतर आरोपींनी नेहा हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून नेहा १९ ऑगस्ट २०२१ रोजी घरातून बेपत्ता झाली होती.शनिवारी( ता.२१) नेहा हीचा मृतदेह त्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत आढळून आला. या प्रकरणी नेहाचे वडील संदीप पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार धनवे करत आहेत.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेची करणार पोलखोल
Next articleपत्रकारांच्या सहकार्याने शांतता प्रस्थापित करणे सोपे झाले-पोलीस निरीक्षक नारायण पवार