हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

राजगुरुनगर– खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, बीएस्सी कॉम्पुटर सायन्स, बीबीए (सी.ए.) या वर्गांची प्रवेश प्रक्रिया दि. २७ जुलै पासून ऑनलाईन सुरू करण्यात आलेली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.hrmrajgurunagar.ac.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन मेरीटचा फॉर्म भरणे;आवश्यक आहे. मेरीटचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्टपर्यंत आहे. फॉर्म भरण्यासंदर्भात अधिक माहिती महाविद्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्राचार्य, डॉ. व्ही. डी. कुलकर्णी (९९२२७४१२४५) उपप्राचार्य, डॉ. संजय शिंदे (९६०४३०९०६०)आणि प्रबंधक, श्री. कैलास पाचारणे (९८५०००८६२६) यांचेशी संपर्क साधावा.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने मेरीटच्या फॉर्मपासून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविली असून प्रवेश शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतः ची काळजी घेत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यास संस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले आहे.

Previous articleचाकणमध्ये कोयत्याने सपासप वार करून ३६ वर्षीय तरूणाचा खून
Next articleसंभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेता तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार