दौंडच्या विद्यार्थ्यांचे कराटे बेल्ट परीक्षेत घव घवीत यश

दिनेश पवार,दौंड

मार्शल आर्ट बॉक्सींग कराटे ट्रेनिंग स्कूल च्या वतीने दौंड शहरा मध्ये रामकृष्ण लॉन्स येथे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत दौंड तालुक्यातून एकूण 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या परीक्षेसाठी कृष्णा आडागळे, हिरालाल साळवे , गणेश फुंडे हे परीक्षक म्हणून लाभले या परीक्षेचे आयोजन संतोष सोनवणे सर यांनी केले होते.

तसेच 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून लहान मुलांनसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या लहान गट प्रथम प्रणव तेलंगे , दृतीय ,संस्कृती शिंदे , मोठा गट प्रथम आयुष कानोजिया , दृतीय सिद्धी लोटके या सर्व विजेत्यांना दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ शितल ताई कटारिया , नगरसेविका ,अरुणा ताई डहाळे ,संस्कार इंग्लिश स्कूल चे चेअरमन जयंत पवार सर , मार्गदर्शक राजेंद्र साळवे , दिलीप डहाळे सर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले श्रुती कटारिया , चेतन जरांडे , सागर रकटे खुशी कटारिया ,हार्ष पोकर ,अभिनव काळे यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी बंडगर हिने केले व आभार प्रशांत खाडे यांनी मानले

Previous articleमांजरी बु. – लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४५ व्या शाखेचे उद्घाटन सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न
Next articleदौंडच्या विद्यार्थ्यांचे कराटे बेल्ट परीक्षेत घव घवीत यश