मांजरी बु. – लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४५ व्या शाखेचे उद्घाटन सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न

उरुळी कांचन

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या, सोलापूर या पतसंस्थेच्या ४५ व्या मांजरी शाखेचा उद्घाटन कार्यक्रम शासनाच्या कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीस अधीन राहून संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी मांजरीचे सरपंच शिवराज घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भूषण तुपे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शैलेंद्र वेल्हेकर, भाजपा पंचायतराज आघाडीचे महामंत्री बाबासाहेब शिगोटे, मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समीर घुले, संजय धारवाडकर, सुनिता घुले, रवींद्र गोगावले, सागर प्रभूने, प्रदीप गोगावले, शिवाजी थोबे, सचिन शेवाळे, योगेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना उदघाटन प्रसंगी बोलताना सुभाष देशमुख म्हणाले की, आम्ही संस्थेचे मालक नसून फक्त विश्वस्थ म्हणून काम करत आहोत तसे पाहता संस्थेचे खरे मालक हे आपणासारखे सभासदच आहेत. आपण टाकलेल्या विश्वासामुळेच आपली ही पतसंस्था महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे नावारुपाला येत असल्याचे दिसून येत आहे. आपण ठेवलेल्या प्रत्येक रुपयाची संरक्षण करण्याची जबाबदारी विश्वस्थ या नात्याने वैयक्तिक रित्या माझी राहील अशी मी ग्वाही देतो. त्याबरोबरच मांजरी या गावी या शाखेच्या रुपाने आपण एक छोटेसे रोपटे लावत आहोत. या रोपट्याचे वटवृक्षा मध्ये रुपांतर होण्यासाठी प्रत्यकाने हातभार लावून तन, मन, धन रुपी खतपाणी घातले पाहिजे व वटवृक्षामध्ये मध्ये रुपांतर झाल्यानंतर त्याला येणारी फळे आपणच चाखावयाची आहेत ही सर्व जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडाल अशी खात्री वाटते.

याबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भूषणजी तुपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक युवराज आप्पाराव गायकवाड यांनी केले, त्यावेळी त्यांनी लोकमंगल समूह व पतसंस्थेच्या वाटचालीबाबत सांगताना संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या आपल्या पतसंस्थेने आज अखेर ८७० कोटी च्या ठेवी तर ६३० कोटी चे वाटप असा १५०० कोटी चा समिश्र व्यवसाय पूर्ती झाल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रमांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात प्रथम सभासद, खातेदार व प्रथम कर्जदार यांचा सन्मान करण्यात आला. सदरहू कार्यक्रमास चेअरमन गुरण्णा अप्पाराव तेली, संचालक शहाजी मोहनराव साठे, युवराज आप्पाराव गायकवाड, संस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका नितीन देवडकर, प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय माळी आदी मान्यवर, कर्मचारी व मोठ्या प्रमाणात मांजरी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश लोंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे चेअरमन गुरण्णा अप्पाराव तेली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..

Previous articleसहिंद्र भावले यांची मास्टर्स गेम्स् असोसिएशन पुणे अध्यक्षपदी निवड
Next articleदौंडच्या विद्यार्थ्यांचे कराटे बेल्ट परीक्षेत घव घवीत यश