गडद येथे कृषी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन

राजगुरूनगर- ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, सरळगाव (ता- मुरबाड, जि-ठाणे ) मधील विद्यार्थी निशांत दाणी, मनोज तळेकर व विद्यार्थिनी अमृता माने, उज्वला भांगरे व निलम साबळे यांकडून प्राचार्य डॉ. सरोदे सर व प्राध्यापक नितीन राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील गडद गावात शेतकऱ्यांना भेटून आधुनिक शेतीबद्दल संपूर्ण माहिती दिली. नवनवीन पद्धतींचा वापर कमीत कमी खर्चात कश्या प्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

Previous articleराष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत रामभाऊ म्हाळगी विद्यालयाचे ५ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक
Next articleराष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत रामभाऊ म्हाळगी विद्यालयाचे ५ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक