राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत रामभाऊ म्हाळगी विद्यालयाचे ५ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक

राजगुरूनगर- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS ) इ. 8 वी साठी 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती . सदर परीक्षेची निवड यादी नुकतीच जाहीर झाली .यामध्ये रामभाऊ म्हाळगी माध्य व उच्च माध्यमिक कडूस (ता . खेड जि. पुणे) या विद्यालयाचे ०९ विद्यार्थी पास झाले आहेत व त्यापैकी धनराज पुरुषोत्तम ढमाले , सोहम सुधाकर जगताप ,धनजंय रविंद्र चिपाडे ,अनुज अविनाश कडूसकर ,पार्थ दत्तात्रय खळदकर हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या विद्यार्थ्याना इ.९ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी केंद्रशासनामार्फत २,४०,००० रू शिष्यवृत्ती रक्कम मिळणार आहे.सन २०११ पासून आजपर्यंत या विद्यालायाचे ४२ विध्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहे .विद्यालयाच्या विविध क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशाबद्दल ग्रामस्थाकडून कौतुक केले जात आहे . विद्यालयाला गुणवत्तेचे ISO मानांकनासाठी विद्यालयाची तयारी चालु आहे .

या विद्यार्थ्याना विद्यालायाचे प्राचार्य संजय शिंदे , पर्यवेक्षक काळोखे अविनाश व शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श पाटील विष्णुपंत यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांचे ,
या यशाबद्दल शिक्षण विकास मंडळ कडूस , अध्यक्ष , सचिव ,संचालक, तसेच ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्याचे व शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक केले.

या कौतुक सोहळाप्रसंगी प्रसंगी कडूस गावचे सरपंच निवृत्तीशेठ नेहेरे, उपसरपंच कैलासराव मुसळे , ग्राम पंचायत सदस्य अरुण भाऊ शिंदे , सदस्य अनिकेत धायबर , सदस्य गणेश मंडलिक , सदस्या सौ .हेमलता खळदकर , सदस्या लता ताई ढमाले , सदस्या शहनाज तुरुक प्राचार्य संजय शिंदे व सर्व शिक्षक वृद उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण काळे सर तर आभार रामदास रेटवडे सर यांनी केले .

Previous articleदेवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आशाताई बुचके यांचा भाजपमध्ये प्रवेश
Next articleगडद येथे कृषी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन