आष्टापूर ग्रामपंचायतचे कार्य स्वच्छता विषयक चांगले सातत्य ठेवावे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के

अमोल भोसले,उरुळी कांचन

आष्टापूर (ता.हवेली) ग्रामपंचायतने स्वच्छता विषयक राबविलेल्या उपक्रम संदर्भात हागणदारी मुक्तगावं पाहणी दौरा अंतर्गत हवेलीचे गटविकास आधिकारी प्रशांत शिर्के, विस्तार अधिकारी शिरीष मोरे यांनी ग्रामपंचायतला सदिच्छा भेट दिली. आष्टापूर हे गाव शंभर टक्के हागणदारी मुक्तगावं झाले असुन सातत्य राखणे आवश्यक आहे असे शिर्के यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या कल्पना जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांच्या नेतृत्वाखाली गावातील पारदर्शक विकास कामे चालू आहे.

याप्रसंगी सरपंच कविता जगताप, उपसरपंच कालिदास कोतवाल, ग्रामविकास अधिकारी ज्योत्स्ना बगाटे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आंगणवाडी सेविका, शिक्षक उपस्थित होते.

जिल्ह्यात स्वच्छता अभियानाअंतर्गत गावस्तरावर स्वच्छता विषयक केलेले कामे व गावस्तरावर नियमित स्वच्छता असलेल्या २८ ग्रामपंचायतीतील ३३ गावे स्वातंत्र्य दिनी हागणदारीमुक्त प्लस स्वयंघोषित केली असून, उर्वरित सर्व गावे सन २०२१-२२ या वर्षात हागणदारीमुक्त प्लस करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

हागणदरीमुक्त प्लस ग्रामपंचायती…

आंबेगाव : राजेवाडी. बारामती : मेखळी, सांगवी, कटफळ. भोर : ससेवाडी, साळवडे व आपटी. दौंड : सहजपूर, भांडगाव. हवेली : गोऱ्हे बुद्रुक, अष्टापूर. इंदापूर : चिखली, शहा, सपकळवाडी व कांदलगाव. जुन्नर : ठिकेकरवाडी, काळवाडी. खेड : कान्हेवाडीतर्फे चाकण, खरपुडी खुर्द. मावळ : देवले, कडधे. मुळशी : भूगाव. पुरंदर : काळदरी, धालेवाडी. शिरूर : विठ्ठलवाडी, चिंचोली मोराची. वेल्हे : घोल, कोलंबी.

Previous articleलीळाचरित्र ग्रंथाला पर्यायी शब्द देऊन वाचकांना श्रीभास्करपाठ ग्रंथ नव्याने प्रकाशित – महंत कृष्णराज शास्त्री
Next articleदेवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आशाताई बुचके यांचा भाजपमध्ये प्रवेश