महाराष्ट्र राज्य विज विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी विपुल शितोळे यांची निवड

कोरेगाव भीमा : महाराष्ट्र राज्य विज विद्युत वितरण नियंत्रण समिती नुकतीच उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालयातून गठित करण्यात आली.. हडपसर चे आमदार चेतन तुपे अध्यक्ष तर पंचायत समिती सभापती सह तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी,खंड विकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,यांसह शिवसेना समन्वयक विपुल शितोळे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

विपुल शितोळे हे शिवसेना पक्षाचे कट्टर शिवसैनिक व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित आहे.अनेक वर्षापासून हवेली तालुक्यामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून विपुल शितोळे कार्यरत असतात. युवा सेना तालुका प्रमुख पदापासून ते शिवसेना समन्वयक पदापर्यंत त्यांचा प्रवास पक्षात झालेला आहे त्याचेच फळ म्हणून त्यांची शिवसेना पक्षाच्या वतीने महवाच्या समजल्या जाणाऱ्या विद्युत वितरण नियंत्रण समिती वर वर्णी लागल्याचे शिवसैनिकांनकडून बोलले जात आहे.

विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य पदाच्या माध्यमातून शेतकरी व सामान्य कुटुंबाचे विजेच्या संदर्भातील प्रश्न,पूर्व हवेलितील वाढते लोडशेडींग संदर्भातील प्रश्न,वेळोवेळी होणारे डीपी चे प्रश्न,शेतकरी व व्यावसायिकांना येणाऱ्या वाढीव विजबिलांबाबत जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न‌ सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे यावेळी विपुल शितोळे यांनी सांगितले. तसेच एम एस इ बी च्या अंतर्गत ज्या काही योजना असतील त्या सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व व्यावसायिक यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष काम करणार असल्याचे देखील यावेळी विपुल शितोळे यांनी सांगितले.

दरम्यान विपुल शितोळे यांचे निवडीने त्यांचे मा खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके,पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे,तालुकाप्रमुख प्रशांत दादा काळभोर यांच्या सह न्हावी सांडस ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Previous articleशेती पंपाची वीज तोडली तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ- शरद सोनवणे
Next articleगांजाची तस्करी करणाऱ्या वाहनास सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले