शेती पंपाची वीज तोडली तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ- शरद सोनवणे

नारायणगाव : (किरण वाजगे )

महावितरण विभागाच्या वतीने जुन्नर तालुक्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज जोड कापले जात आहेत. त्याविरोधात आज जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने नारायणगाव येथील वीज वितरण कार्यालयावर जाऊन धरणे आंदोलन करत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.

महावितरण विभागाचा कारभार अत्यंत अनागोंदी पद्धतीने सुरू असून येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाची मनमानी चालू आहे. काही दिवसांपूर्वी बोरी साळवाडी येथे शेतकरी पिता पुत्राचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने नारायणगाव येथील वीज वितरणच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या नारायणगाव कार्यालयात याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालयाच्या वतीने जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांची शेती पंपाची जर वीज तोडण्यात आली तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून शिवसेनेची नेहमीची आंदोलनातील स्टाईल दाखवून संबंधित अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्यात येईल.

नारायणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात निवेदन देते प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, बाजार समितीचे माजी संचालक आनंद रासकर, शहरप्रमुख संतोष वाजगे, अनिल खैरे, सरपंच योगेश पाटे, सदस्य अरिफ आतार, गौतम औटी, विकास तोडकरी, किरण शेटे तसेच वीज वितरण चे अधिकारी सोनवणे व शेतकरी उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्र राज्य वीज वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी विपुल शितोळे यांची निवड
Next articleमहाराष्ट्र राज्य विज विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी विपुल शितोळे यांची निवड