महाराष्ट्र राज्य वीज वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी विपुल शितोळे यांची निवड

गणेश सातव,वाघोली

महाराष्ट्र राज्य विज वितरण नियंत्रण समितीची पुणे जिल्हा कार्यकारिणी नुकतीच उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे तर कार्यकारिणीमध्ये हवेली पंचायत समिती सभापती सह, तहसीलदार , उपविभागीय पोलिस अधिकारी,गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांसह अशासकीय सदस्यपदी शिवसेना समन्वयक विपुल शितोळे यांची निवड करण्यात आली आहे.

विपुल शितोळे हे शिवसेनेचे युवा कार्यकर्ते असून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित आहे.

अनेक वर्षापासून हवेली तालुक्यामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून विपुल शितोळे कार्यरत आहेत.शाखाप्रमुख,युवा सेना तालुका प्रमुख पदापासून ते शिवसेना समन्वयक पदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास आहे.त्यांच्या पक्षीय कार्याची दखल घेऊन त्यांची शिवसेना पक्षाच्या वतीने महवाच्या समजल्या जाणाऱ्या विद्युत वितरण नियंत्रण समिती वर वर्णी लागल्याचे शिवसैनिकांनकडून बोलले जात आहे.

विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य पदाच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांच्या विजेच्या संदर्भातील प्रश्न,पूर्व हवेलीतील वाढते लोडशेडींग संदर्भातील प्रश्न,वेळोवेळी उद्भवणारे डी.पी संदर्भातील प्रश्न,शेतकरी व व्यावसायिकांना येणाऱ्या वाढीव विजबिलांबाबत जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न‌ सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे यावेळी विपुल शितोळे यांनी सांगितले. तसेच महावितरणच्या अंतर्गत ज्या काही योजना असतील त्या सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व व्यावसायिक यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे देखील यावेळी विपुल शितोळे यांनी सांगितले.

दरम्यान विपुल शितोळे यांचे निवडीने त्यांचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख माऊलीआबा कटके,पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे,तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांच्या सह पूर्व हवेलीतील शेतकरी,ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Previous articleधक्कादायक! अल्पवयीन मुलीवर ४४ वर्षीय इसमाचा बलात्कार
Next articleशेती पंपाची वीज तोडली तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ- शरद सोनवणे