धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर ४४ वर्षीय इसमाचा बलात्कार

राजगुरूनगर- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात  एका ४४ वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलीस अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

जीवे मारण्याची धमकी देऊन एका १७ वर्षाच्या मुलीवर ४४ वर्षांच्या व्यक्तीने बळजबरी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चास येथे घडला आहे. मुलगी गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार समोर आला या प्रकरणी गणेश वामन सपाट (वय ४४, सपाटवाडी, कमान , ता.खेड, जि.पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलीची आई घरी नसताना डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान पिडीत मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन‌ वेळा बळजबरीने संबंध ठेवल्यामुळे पिडित मुलीला त्रास होऊन गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आरोपी गणेश सपाट याला पोलिसांनी अटक केली असून सात दिवसांची न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. खेड पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत

Previous articleउंडवडी येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे उद्घाटन
Next articleमहाराष्ट्र राज्य वीज वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी विपुल शितोळे यांची निवड