उंडवडी येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

अमोल भोसले,उरुळी कांचन

उंडवडी (ता.दौंड) ग्रामपंचायत कार्यालय येथे कोरोना नियंत्रण कक्षचे उदघाटन सरपंच दीपमाला जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, पुणे जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या कोरोना मुक्त गाव अभियान या आव्हानाला प्रतिसाद देतं उंडवडी गावात पाच प्रकारच्या समित्या तयार करून कोरोना नियंत्रण कक्षचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी समिती मध्ये निवड करण्यात आलेल्यांना ग्रामपंचायत कडून नियुक्तीपत्रक देखील देण्यात आले.

भारतीय जैन संघटनेचे कार्य आणि या अभियान विषयी मार्गदर्शन भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक मयूर सोळसकर आणि अशोक वणवे यांनी केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, राहूचे सुनील भटेवरा, मराठा महासंघ तालुका उपाध्यक्ष संजय थोरात, सरपंच दीपमाला जाधव, उपसरपंच विकास कांबळे, ग्रामसेवक मीनाताई उबाळे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडधे, वसंत कांबळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड, माजी सरपंच विकास सोनवणे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मैनाताई गुंड, सुनील नवले, रोहिदास जाधव, विजय जाधव, आबासाहेब थोरात, काशिनाथ होले, प्रकाश होले, धनंजय होले, संदिप जाधव, भिकु कांबळे, अनिल कुल, सतीश लोहकरे, माणिक कांबळे, प्रफुल्ल दोरगे, रुपेश गायकवाड, हनुमंत जाधव, समाधान क्षीरसागर, सुनील कांबळे, परशुराम गुंड, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा यांच्या वतीने उपस्थित ग्रामस्थ्यांना अर्सेनिक अल्बम या प्रतिकार शक्ती वाढणाऱ्या गोळ्यांचे वाटत करण्यात आले. सदर कार्यक्रमचे सूत्रसंचालन तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिनेश गडदे यांनी केले तर आभार वसंत कांबळे यांनी मानले.

Previous articleडॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या राजगुरूनगर शाखेचा २० आँगस्ट रोजी आमदार दिलीप मोहिते आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Next articleधक्कादायक! अल्पवयीन मुलीवर ४४ वर्षीय इसमाचा बलात्कार