दौंड मध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

देशात सध्या वाढत्या कोविड-19,कोरोना च्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा सगळीकडे आहे. दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढू लागली आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत दौंड मध्ये DBN ग्रुप व रिपाइं(A) यांच्या वतीने,आयु दिपक  भाऊ निकाळजे यांच्या  वाढदिवसानिमित्त दौंड मध्ये ( दि.२५) रोजी रक्तदान शिबीर घेतले असता सोशल डिस्टस्टिंग पाळून १२२ नागरिकांनी रक्त पिशव्या रक्तदान झाले.

DBN संघटनेचे व रिपाइं (A) चे दौंड तालुका अध्यक्ष आयु सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात व संघटनेचे युवानेते आयु.शशांक भाऊ गायकवाड,विजय शिंदे, आयु बाबा कोरे,आयु.प्रवीण धर्माधिकारी ,आयु.अभय भोसले ,आयु.संतोष दनाने,आयु. अमित पाडळे,आयु.रुपेश राठोड ,आयु.मिलिंद गायकवाड ,आयु.गणेश शिंदे, आयु.राज गायकवाड,आयु. कुलदीप कांबळे ,आयु.ईश्वर सांगळे ,आयु.अमोल नेटवटे,आयु. अमर गायकवाड यांच्या नेतृत्वात व सर्व DBN ग्रुप व रिपाइं (A आंबेडकर) पार पडला.त्यासमयी रोटरी ब्लड बँक दौंड व संजीवनी ब्लड बँक पुणे यांचे व डॉ.P B पवार साहेब मुख्य मिशन हॉस्पिटल व नगरसेवक बबलू कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleचालू शैक्षणिक वर्षात १ ली ते १२ वी पर्यंतचा अभ्यासक्रम २५ टक्के वगळणार
Next articleपुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आले यश