लिओ क्लब जुन्नर शिवनेरी यांनी केले सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे

नारायणगाव : (किरण वाजगे )

लिओ क्लब जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसोबत अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. लायन्स क्लब चे जिल्हा प्रांतपाल ला. हेमंत नाईक यांच्या पुढाकाराने लिओ क्लब सैनिकांसाठी सर्वत्र रक्षाबंधन साजरा करत आहे. या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

लिओ क्लबच्या अध्यक्षा डॉ. धनश्री गुंजाळ, सेक्रेटरी श्वेता शिंदे, खजिनदार डॉ. प्रिया जठार यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांसाठी रक्षाबंधन हा कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आला.

याप्रसंगी भारतीय लष्कर सेवेतील निवृत्त सुभेदार मेजर उमेश पांडुरंग अवचट, भारतीय हवाईदल सेवेतून निवृत्त झालेले बाळासाहेब कुशाभाऊ मुळे, भारतीय नौदलातून निवृत्त झालेले राजेंद्र दशरथ अडसरे आणि भारतीय लष्कर सेवेत सध्या कार्यरत असणारे ज्ञानेश्वर सुभाष खांडगे हे उपस्थित होते.

या आजी-माजी शूर वीरांचा सन्मान व त्यांना रक्षाबंधन लिओ क्लब जुन्नर शिवनेरी तर्फे करण्यात आले. या प्रसंगी या वीर सैनिक अधिकाऱ्यांनी त्यांचे लष्करी सेवेतील प्रेरणादायी अनुभव कथन केले.

यावेळी सीमेवरील जवानांना रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवण्यासाठी जुन्नर तालुक्यातून १५० राख्या विद्यार्थिंनीकडून जमा करण्यात आल्या. यंदा रक्षाबंधनाचे औचित्य साधून या सर्व राख्या सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत.

याप्रसंगी लायन्स क्लबचे सदस्य ला. नरेंद्र गोसावी दीपक वारूळे, जितेंद्र गुंजाळ, नवीन पटेल, योगेश जुन्नरकर, अजित वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते. सीमेवरील सैनिकांसाठी राख्या पाठवणे आणि आजी-माजी सैनिक अधिकाऱ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा करणे. या प्रकारचे यशस्वी नियोजन प्रकल्प समन्वयक लिओ जुईली गुंजाळ आणि श्रावणी शिंदे यांनी केले.

हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी लिओ. केतन जगताप, सर्वेश मांडे, काजल डोंगरे, अवधूत कोर्‍हाळे, यश जठार, शिवकुमार चव्हाण, साक्षी खैरे आणि मोनिका पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ धनश्री गुंजाळ यांनी केले तर आभार केतन जगताप यांनी मानले. याप्रसंगी सशस्त्र सेवेतील सैनिकांसाठी आभाराची भावना व्यक्त करणारी पत्रे यावेळी विद्यार्थ्यांनी लिहून पाठवली.

Previous articleपारधी समाजासाठी शेवराई सेवाभावी संस्थेचे काम हितदायी- नामदेव भोसले
Next articleवृत्तपत्रांची थकीत जाहिरातींची बिले त्वरित चुकती करण्याची एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी