पारधी समाजासाठी शेवराई सेवाभावी संस्थेचे काम हितदायी- नामदेव भोसले

अमोल भोसले,पुणे

गेली पाउनशे वर्ष उपास मारीत दोन घास मिळवण्यासाठी व रहाण्यास निवारा मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या आदिवासी पारधी बांधवाना मिळाला न्याय. शेवराई सेवाभावी संस्थांकडून केलेल्या पारधी समाजातील लोकांचे 16 मुद्द्याचे मागण्याचे निवेदन पास करण्यात आले आहेत.

शेवराई शेवाभावी संस्थाच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रातील आदिवासी पारधी कुटुंबातील लोकांना अंतोदय योजनेंतर्गत लाभ देउन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे जीआर महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहेत, महाराष्ट्र शासन निर्णयान्वये महाराष्ट्रातील पारधी समाजातील कुटुंबाना महात्मा फुले महामंडळ अंतर्गत राज्यातील खाजगी हाॅस्पिटल मध्ये विनामूल्य विलाज केला जाईल आणी राज्यातील पारधी समाजातील कुटुंबाना बि पी एल शिधापत्रिका देण्यात यावेत व शिधापत्रिका वितरणाच्या प्रचलित पध्दतीनुसार पारधी लोकांना शिधापत्रिका विनामूल्य वितरीत करण्यात यावी याबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालय यांना राज्य शासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत.

सदर राज्यातील आदिवासी पारधी समाजातील लोकांनी आप आपल्या तालुक्यातील तहसील कार्याल व मंडलाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन आदिवाशी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले केले आहे. भोसले पुढे म्हणालेकी राज्य शासनाने 16 मुद्यावर झालेल्या मागणीला महाराष्ट्र शासनाने मंजुरी देऊन सर्व मागण्या मंजूर करण्यात आले आहेत हे आदिवासी पारधी समाजासाठी आनंदीदाई बाब आहे, सदर महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे व शेवराई सेवाभावी संस्थेचे या कामांचे कौतुक संपूर्ण राज्यातुन होत आहे.

Previous articleकै.इंद्रजित सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबीर
Next articleलिओ क्लब जुन्नर शिवनेरी यांनी केले सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे